बार्टीच्या विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा

बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिपची रक्कम अदा करा, नसता रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू महासंचालकांकडे निवेदनाद्वारे मागणी, रामदास आठवले यांना साकडेऔरंगाबाद प्रतिनिधी : पुणे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून २०१८ मध्ये "बीएएनआरएफ २०१८ फेलोशिपसाठी अर्ज करुन पात्र ठरलेल्या ४०८ विद्यार्थ्यांना आतापर्यंत एक रुपयाही देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संशोधन रखडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी अगाेदर या संशाेधक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात फेलोशिपची रक्कम तत्काळ अदा करावी, नसता सर्व संशोधक विद्यार्थी रस्त्यावर उतरु, असा इशारा बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना संशोधक विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे दिला.


     बार्टीने जुलै २०२० च्या पहिल्या आठवड्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१८ यासाठी पात्र ठरलेल्या ४०८ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर झाल्याची यादी बार्टीच्या संकेतस्थळावर जाहिर केली. परंतु जी यादी २०१९ च्या जानेवारी महिन्यात किमान मंजूर हाेणे गरजेचे हाेते. ती  बार्टीच्या गलथान व मनमानी कारभारामुळे तब्बल दोन वर्षानंतर जुलै २०२० मध्ये मंजूर झाली. त्यातच एमफिल करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा कालावधी संपत आला आहे. तरी बार्टीने चार महिने उलटले तरी एकाही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात फेलोशिपचे पैसे जमा केले नाही. त्यामुळे मागील दाेन महिन्यापासून संबंधित विभागाकडे विद्यार्थ्यांच्या खात्यात फेलोशिपचे पैसे टाकण्याची मागणी विद्यार्थी करत आहे. त्यातच स्थाानिक लाेकप्रतिनिधींना भेटून संबंधित विभागाला या विद्यार्थ्यांना फेलोशिप तत्काळ अदा करा, यासाठी बार्टीला आपल्या माध्यमातून सांगा, असे म्हणत विद्यार्थी मुंबई व पुणेला चकरा मारत आहे. या विद्यार्थ्यांनी मुंबईत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना यात लक्ष घालण्याची मागणी केली. या वेळी विद्यार्थ्यांना तत्काळ पैसे अदा करा, असे स्वत: आठवले यांनी बार्टीचे महासंचालक, सामाजिक न्यायमंत्री व बार्टीचे चेअरमन तथा प्रधान सचिव तांगडे यांच्या नावे पत्र देत आदेश दिले. त्यातच बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची साेमवारी पुण्यात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी तत्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करा, नसता रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडू, असा इशारा कल्पना कांबळे, संगीता वनखंडे, विष्णूकांत अंमलपुरे, प्रशांत डोंगरे, संतोष सोनवणे, प्रवीण वानखडे आदींनी केली आहे.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..