केंद्रीय सैनिक बोर्डच्या आर्थिक मदत योजनेसंदर्भात

केंद्रीय सैनिक बोर्डच्या आर्थिक मदत योजनेसंदर्भात


ऑनलाइन अर्जाबाबत आवाहनमुंबई प्रतिनिधी : इयत्ता 1 ली ते 9 वी तसेच 11 वी मधून सन 2019-20 मध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा पुढील वर्गात गेलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक क्षेत्रात बदल झाल्याने अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे बरेच विद्यार्थी मूळ गुणपत्रिकेअभावी केंद्रीय सैनिक बोर्डमार्फत मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी ऑनलाइन अर्ज करु शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मूळे गुणपत्रिकेच्या ऐवजी पुढील वर्गात प्रमोट केल्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा/ संस्थेकडून प्राप्त करुन घेऊन केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या वेबपार्टलवर (www.ksb.gov.in) ऑनलाईन अर्ज सादर करताना अपलोड करावे. ऑनलाईन अर्ज  30 नोव्हेंबर 2020 पर्यंत स्विकारले जातील.


      अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर विद्यावी.रत्नपारखी, यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..