वर्षा बंगल्यावरील खर्च तथ्यहीन

वर्षा बंगल्याच्या नुतनीकरणासाठी भरमसाठ खर्च झाल्याचे वृत्त तथ्यहीन 

९२ लाख रुपये कामाची निविदा


मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या नुतनीकरण कामासाठी सुमारे ९२ लाख रुपयांची  कामाची निविदा काढण्यात आली असून यावर ८९ लाख ९० हजार रुपयांचे काम आत्तापर्यंत करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. काही माध्यमांमध्ये वर्षा निवासस्थानासाठी ३ कोटी २६ लाख रुपये खर्च झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे मात्र केवळ ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या मर्यादेत काम होत आहे. मलबार हिलवरील वर्षा तसेच इतर मंत्र्यांचे बंगले हे खूपच जुने झाले असून आवश्यक ती दुरुस्ती व नूतनीकरण गरजेचे होते असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे

 

 

दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏