कोरोनारुपी कवितेतून नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 कोरोनारुपी संक्रांत


साल गेलं, काल गेलो 

घरी बसून, कमावलेला माल गेला.

कोणी म्हणते डिलीट करा वर्षे

पण दिसत होता लहानग्यायांच्या खेळात हर्ष

झाले कमी अभ्यासाचे ओझे

विद्यार्थ्यांना वेळ मिळाला करायला मौज-मजे

घरातून सुरू आहे कार्यालयाचे काम

दग-दग संपली प्रवासाची घरीच मिळतो दाम

 कोणीम्हणे गावी जाऊन अडकले

काहींना बऱ्याच वर्षींनी आपले गाव दिसले 

खेडी पुन्हा माणसांनी भरून गेली.

खेड्याकडे चला ही महात्माजींची हाक आठवली, 

कोरोनारूपी पुढील संक्रांतम्हणे तरूणांवर आहे,

संकटत आजून संपलेनाही, माणसा आहे तसा राहे 

वीस मात्र भरून पावले, काय बोलतील एकवीसची पाऊले. 

              कवी- नारायण दळवी.

दिगंबर वाघ

कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


🙏सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा🙏