के.डी.एम.सी ने बेवारस भंगार वाहने उचली

नागरिकांना प्रवास करणे सुलभ व्हावे - विजय सूर्यवंशी आयुक्तकल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका परिसरातील बेवारस/भंगार वाहने उचलण्याची कारवाई 3/क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी आजही सुरु ठेवली असून क प्रभागक्षेत्र अधिकारी भांगरे यांनी पोलीस व महापालिका कर्मचारी यांच्या मदतीने 2 चारचाकी, 5 तीन चाकी व 19 दुचाकी अशी एकूण 26   बेवारस/भंगार वाहने उचलून वसंत व्हॅली येथील वाहन तळावर जमा केली. तसेच 32 शेड व 3 हात गाड्यांवर निष्कासनाची कारवाई केली.


       डोंबिवलीच्या ई प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडदे यांच्या  पथकाने मानपाडा पोलिस स्थानकातील पोलीस निरिक्षक, चौधरी व ‍त्‍यांच्या पथकाच्या सहकार्याने ई प्रभागात मानपाडा, लक्ष्मी नगर ते सुयोग हॉटेल ते घारडा सर्कल परिसरात रस्त्यावर/रस्त्यालगत उभी असलेली 20 वाहने (11 दुचाकी, 5 चारचाकी, 3 रिक्षा व 1 टेम्पो) 2 हायड्रा व 3 डम्परच्या सहाय्याने उचलून खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत.


     दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


 


🙏सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा🙏