मुख्य सेविकांच्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करणार

मुख्य सेविकांच्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती, पदोन्नतीची जलदगतीने कार्यवाही करावी

-  महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई प्रतिनिधी: राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत मुख्य सेविका यांचे वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती व पदोन्नती तसेच सेवा विषयक दुरुस्ती करुन जलदगतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. मुख्य सेविका यांचे वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती व पदोन्नतीबाबत बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सहायक आयुक्त नितीन म्हस्के तसेच राज्यातील मुख्य सेविका यावेळी उपस्थित होत्या. ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, मुख्य सेविका यांचे वेतन आयोगातील वेतन त्रुटी, दुरुस्ती व पदोन्नतीबाबत जिल्हानिहाय आढावा घेवून रिक्त पदे भरणे व पदोन्नतीबाबतचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. ग्रामीण  व आदिवासी क्षेत्रातील पदे प्राधान्याने भरण्यात यावी.

      बदली धोरण अधिक पारदर्शक राबविण्यात यावे. तसेच वित्त विभाग व ग्रामविकास यांची संयुक्त बैठक घेवून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. असेही ॲड. ठाकूर यांनी सांगितले.मुख्य सेविका संवर्गातून पदोन्नती किंवा परिविक्षा अधिकारी हे पद सुनिश्चित करण्यात आले असून पदोन्नती देणात येणाऱ्या वेतनामध्ये केवळ 100 रुपयांचा फरक आहे व त्यामुळे वर्ग 2 या संवर्गात पदोन्नती देण्यात यावी. शहरी प्रकल्पातील मुख्य सेविका या आदी सरळ सेवा भराती प्रक्रियेने पदावर नियुक्त झालेल्या आहेत. तेव्हा पदोन्नती प्रक्रिया करताना इतर  विभागाप्रमाणे विभागीय परिक्षा घेण्यात यावी अशा विविध मागण्या मुख्य सेविका यांनी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏