भीमा कोरेगाव दिनानिमित्त ऑनलाईन प्रबोधन

भीमा कोरेगाव दिनानिमित्त ऑनलाईन प्रबोधन

पुणे प्रतिनिधी : भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त ऑनलाईन झूम ॲपच्या माध्यमातून प्रबोधनाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, समतादूत प्रकल्प जालना विभाग यांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त ऑनलाईन प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख होते म्हणून डॉक्टर प्रा. डॉ.वाल्मीक सरवदे सर हे लाभले होते तर प्रमुख अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉ. आदिनाथ इंगोले हे लाभले होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी समाजात चाललेल्या सध्याची परिस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार किती महत्त्वाचे आहे समाजातील विद्यार्थी कसा असावा आज फिलोशिप घेणारे विद्यार्थी युपीएससी-एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या अडचणी समाजातील अडचणी व फिलोशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक या सर्वच विषयांच्या बाबतीत सखोल चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले जीवन जगत असताना जिवनातील प्रत्येक क्षण हा किती मोलाचा आणि  सखोल आत्मीयतेने साकारावा हेही त्यांनी सांगितले आयुष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या हातात लेखणी दिल्या परंतु लेखणी हातात घेतल्यानंतर तलवार कशी चालावी हे ज्ञान विद्यार्थ्यांना असावे हे ही त्यांनी सांगितले जिवनात येणार्‍या प्रत्येक संकटना कशा पद्धतीने उभे राहायचं आणि तेच संकट पार करून आपले ध्येय साध्य कसं करायचं अशा सुंदर वक्तव्य त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण इंगोले सरांनी केले आणि इंगोले सरांना ही विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असा मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील विद्यार्थी आणि शासकीय कर्मचारी लाभले होते यात प्रामुख्याने प्रा.ज्योती बोर्डे प्रा राहुल वाघ प्रा.कल्पना कांबळे  प्रा.सूर्या सर प्रा.परघणे मॅडम प्रशांत दाभाडे सर जास्ती जयस्वाल चंद्रकांत गांगुर्डे सर डॉ सचिन बोर्डे डॉ. सुशिल बोर्डे रंजना मॅडम असे विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती तसेच  कार्यक्रमाचे आयोजक प्रा. रेखा बोर्डे यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेखा बोर्डे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिता बोडखे  मॅडम यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे सर यांचेही मार्गदर्शन लाभले होते तसेच समता दूत आतिश बेद्रे पारुल राठोड सतीश पवार अनिता बोडके दिपाली मंडलिक भगवान कुदर सुधाकर वर्पे कमर्से या सर्व लोकांनी अतिशय प्रयत्न केले.


 


दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏