पोलिस दलातील ४३८ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली

पोलिस दलातील साह. पोलिस निरीक्षक यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली.

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पोलिस मुख्यालय मुंबई यांनी ४३८ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. नि: शास्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती दिली.सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ नुसार देण्यात आली आहेत.  २९/१२/२०१७ च्या शासन निर्णयान्वये तुर्तास पदोन्नतीच्या कोटयातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहुन भरण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यास अनुसरुन नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांचे खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना नि:शस्त्र पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा विभागीय पदोन्नती समितीने निर्णय घेतला आहे. 

   वर नमूद केलेल्या तात्पुरत्या पदोन्नतीच्या आदेशाधिन असलेल्या नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षकांविरुध्द आता गुन्हा दाखल झाला असेल / निलंबनाची कारवाई केली असेल विभागीय चौकशी प्रलंबित असेल /सौम्य शिक्षेची अंमलबजावणी अद्याप सुरु झालेली नसेल न्यायालयीन प्रकरण  प्रलंबित असेल, किंवा ते एखादी शिक्षा भोगत असतील तसेच त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसेल अथवा अधिसंख्या पदावर वर्ग केले असल्यास संबंधित घटक प्रमुखांनी त्यांना पदोन्नतीवर न सोडता त्यांच्या विरुध्दच्या प्रकरणांची सविस्तर माहिती या कार्यालयास ई-मेलव्दारे । फॅक्सव्दारे तात्काळ पाठवावी, व पुढील आदेशांची वाट पहावी. पदोन्नती झालेल्या नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीवर कार्यमुक्त करण्यापुर्वी ते ज्या घटकांत पदोन्नतीवर जाणार आहेत, त्या घटकप्रमुखांकडे रिक्त पदांची खात्री करुनच त्यांना कार्यमुक्त करावे.रिक्त पद नसल्यास तसे हया कार्यालयास कळवावे.

   जर कोणत्या घटकामध्ये निवडणूकीची प्रक्रिया सुरू असल्यास किंवा त्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू असल्यास घटक प्रमुखांनी त्याबाबत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजीपूर्वक दक्षता घ्यावी.दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


  🙏  एक वचन तीन नियम  🙏

) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा