फ्रन्टलाईन वर्कर्सनी वॅक्सीन घेण्यासाठी पुढे यावे ! आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी 

डॉ.विजय सुर्यवंशी आयुक्त कडोंमनपा यांच्यासह पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी कोविड-१९ ची लस घेतली


 कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण :वॅक्सीन हे अत्यंत सुरक्षित असून फ्रन्टलाईन वर्कर्सनी वॅक्सीन घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी यांनी आज केले. आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी आणि परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी आज महापालिकेच्या कल्याण मधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात कोविड-19 ची लस घेतली त्यावेळी आयुक्तांनी हे आवाहन केले. या वेळी महापालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील आणि बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ.टिके,वैदयकीय अधिकारी डॉ.  दौंड  तसेच IMA कल्याण चे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील उपस्थित होते. महानगरपालिकेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार , 16 जानेवारी पासून कोविड-19 चे लसीकरणास सुरवात केलेली आहे आता पर्यंत ब-याच हेल्थ वर्कर्सनी कोविड-19 ची लस घेतली असून महानगरपालिकने आता फ्रन्टलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरु केले आहे महापालिकेचे सुमारे 5200 फ्रन्टलाईन वर्कर्स आहेत  त्याचप्रमाणे सुमारे 1200 पोलिस कर्मचारी व 100 पोलिस अधिकारी हे देखील फ्रन्टलाईन वर्कर्स आहेत त्यांचे लसीकरणास आता प्रारंभ झाला आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८

  🙏  एक वचन तीन नियम  🙏

) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा