जन माहिती अधिकारी यांना १५००० रूपये दंड..

माहिती न दिल्यामुळे कल्याण तहसील कार्यालयातील झुगरे यांना १५००० रूपये शास्ती व तहसीलदार आकडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.

             कल्याण प्रतिनिधी : माहिती अधिकार अधिनियम-२००५ नुसार नागरिकांना माहिती न देणे अधिकाऱ्यांना महागात पडले. तरी शासकीय यंत्रणा काही सुधारण्यास तयार नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की अर्जदार तारवेंद्र कुशवाह यांनी 2३/०८/२०१८ रोजी जोडपत्र 'अ' सादर केले होते व त्यानंतर जोडपत्र 'क' ६/१०/२०१८ रोजी दिले. तहसील कार्यालय कल्याण येथील जन माहिती अधिकारी सखाराम झुगरे यांनी १ वर्ष ५ महिने १२ दिवसानंतर एक मुर्खासारखे पत्र पाठवले. प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सुनावणी तर घेतली नाही. परंतु अर्ज कचऱ्यामध्ये फेकून दिला. त्यानंतर राज्य माहिती आयोग कोकण येथे सुनावणी झाली त्यावेळी माहिती १५ दिवसात माहिती देण्यात यावी. असा आदेश देऊन सुद्धा तहसील कार्यालय कल्याण येथील अधिकारी यांनी माहिती दिली नाहीत.

      अर्जदार यांनी सांगितले की याबाबत मला वेळोवेळी माझे स्नेही व गुरुस्थानी मार्गदर्शन दिगंबर वाघ यांनी केले याचे सर्व श्रेय मी दिगंबर वाघ यांना देईल तसेच शास्ती व शिस्तभंगाची कारवाई झाली परंतु मला आजही माहिती मिळाली नाही याची खंत आहेत यावर मी वाघ साहेबांचे मार्गदर्शन घेईल.

     सखाराम झुगरे जन माहिती अधिकारी तथा अव्वल कारकून यांना १५००० रुपये त्यांच्या वेतनातून ३ मासिक हप्त्यात वसूल करून ००७ प्रशासकीय सेवा ६० इतर सेवा ८०० या लेखाशिर्ष काम मध्ये जमा करण्यासाठी कळवले आहेत. तसेच तत्कालीन प्रथम अपीलीय अधिकारी तहसीलदार दिपक आकडे यांनी कोणती ही कारवाई न केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी यांना राज्य माहिती आयुक्त खंडपीठ कोकण यांनी आदेशित केले आहेत.

   यामध्ये राज्य माहिती आयुक्त कोकण हे आदेश देताना अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे बघून निकाल देत असल्याचे अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते सांगतात. शास्ती ही २५००० रुपये असताना कमी कोणाच्या आदेशाने केली जाते. यामागचे  गौडबंगाल आजपर्यंत कळत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

  राज्य माहिती आयोग कोकण या कार्यालयातील आयुक्तांसह अधिकारी यांची अनेक जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध आहेत. ते कमी जास्त प्रमाणावर झाले की शास्ती ही तशाच प्रमाणांत लावण्यात येते. - संजय पाटील, संस्थापक अध्यक्ष, कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई.

दिगंबर वाघ             

      कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


        🙏  एक वचन तीन नियम  🙏

   १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा