कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम समायोजनासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार

 पनवेल मनपा कंत्राटी कर्मचारी महासंघाची कार्यकारणी जाहीर  – मुकुंद जाधवर

पनवेल प्रतिनिधी :  नव्याने निर्मित झालेल्या पनवेल महानगरपालिके मध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांनी दिली आहे. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम समायोजनासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे मत महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी व्यक्त केले आहे.

          पनवेल महानगरपालिका कंत्राटी कर्मचारी महासंघाची बैठक नुकतीच घेण्यात आली होती. याबैठकीत महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना ६० टक्के केंद्र सरकारचे व ४० टक्के राज्य सरकारचे असे एकूण १०० टक्के मानधन दिले जाते. पण, ते मानधन वेळेवर मिळत नसल्याचे निदर्शनास आले व त्यातील फार देखील अध्याप आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्याचे कळाले. तसेच वेतन वाढ, सुट्ट्या आदी विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर गेली अनेक वर्षांपासून येथील कर्मचारी याच ठिकाणी काम करत असून त्यांना कायम समायोजन करण्याचे कोणतीही हालचाल नसल्याचे देखील निदर्शानास आणून देण्यात आले. त्यावर मुलाणी म्हणाले की, महासंघ कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असून न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच वेळ असल्यास आंदोलन देखील उभारू असे अध्यक्ष मुकुंद जाधवर म्हणाले. दरम्यान पनवेल मनपा मधील सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी महासंघाच्या पनवेल मनपा क्षेत्राच्या अध्यक्ष पदी डॉ. पद्मिनी येवले, कार्याध्यक्ष पदी डॉ. रेहना मुजावर यांची तर सचिव पदी भारती पवार यांची निवड करण्यात आली त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या सत्कार करताना महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर व महासंघाचे मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी हे उपस्थित होते.

         दरम्यान महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या पनवेल मनपा कार्यकारणी मध्ये निमंत्रक म्हणून लढवय्ये नेते मिलिंद खाडे व पनवेल शहराचे अभ्यासू नेते कासम मुलाणी नियुक्ती अध्यक्ष मुकुंद जाधवर यांनी केली. तर पनवेल मनपा महासंघाची शाखा स्थापन करण्यासाठी शाहरुख मुलाणी यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे जाधवर म्हणाले.

दिगंबर वाघ             

     कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८