त्यागमूर्ती सावित्रीमाई फुले ...!

त्यागमूर्ती सावित्रीमाई फुले ...!

कालच ८ मार्च ला जागतिक महिला दिन साजरा झाला मात्र आज त्या महानायीकेची पुण्यतिथी आहे ज्यांनी भारतीय स्त्री जगण्याला नवी दिशा आणि उजळणार आकाश दिल. होय त्या आहे क्रांतीजोती सावित्रीमाई फुले . माई चा जन्म ३ जानेवारी १८३१ सालचा ,वयाच्या अवघ्या १० वर्षाच्या असताना १८४० साली त्यांचा विवाह जोतीराव फुलेंशी झाला.त्यावेळी जोतीरावांचे वय १३ वर्ष. सावित्रीमाईनी घरीच शिक्षण घेऊन अहमदनगर येथे फरारबाईच्या व पुणे येथे मिचेल बाईच्या नॉर्मल स्कूल मध्ये अध्यापनाचे शिक्षण घेतले .त्यांनी शिकवण्यासाठी घराच्या बाहेर टाकलेले पहिले पाउल हीच आधुनिक स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात आणि स्त्री मुक्तीचा संग्राम म्हणायला हरकत नाही . तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेला धक्का लावण्याचे काम ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी केले.सावित्रीमाई प्रथम शिक्षिका,मुख्याध्यापिका व पुढे जाऊन समाजसेविका झाल्या.त्याने शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक योगदान खूप मोठे आहे.

        भारतातील पहिली मुलींची शाळा १ जानेवारी १८४८ साली पुणे येथे सुरु झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी पटावर ८ मुली आणि थोड्याच दिवसात ४८ मुली अशी संख्या वाढत गेली.मुलींचा शिक्षणाकडे वाढता कल बघून पुणे परिसरात अगदी कमी कालावधीत सुमारे १८ नव्या शाळा सुरु करण्यात आल्या.माई च्या  शाळेतील शिक्षण श्रेष्ठ दर्जाचे असल्या कारणाने सरकारी शाळेतील संखे पेक्षा १० पट जास्त  संख्या माईच्या शाळेत होती. सावित्री माईनी १५मे १८४८ रोजी मराठ वाड्यात अस्पुश्य मुला मुलीसाठी वेगळी शाळा सुरु केली. भारत देशात १५० वर्षापूर्वी तत्कालीन व्यवस्थेप्रमाणे स्त्री शिक्षण बंदी होती. मनुस्मृती या विकृत ग्रंथाचा फार मोठा प्रभाव सर्वच समाजावर होता. मुलीची शाळा शुद्र समजल्या जाणाऱ्या जोडप्याने सुरु केली हे समजताच सनातन्यांचा पुण्यात एक प्रक्षोभ उसळला. त्याचा संताप शिगेला पोहोचला. सावित्री माईना त्रास देण्याचे नाना उद्योग सुरु झाले. रस्त्याने शाळेला जाताना शेण टाकणे, चिखल फेकणे , खडे मारणे,अचकट-विचकट बोलणे,निंदानालस्ती करणे असे उद्योग सुरु होते.त्या शाळेत जातांना दोन लुगडे घेऊन जात असत शाळेत प्रवेश केल्यावर त्या अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून मुलांना शिकवायला सुरवात करत असत.

             प्रशिक्षित शिक्षकांचा तुटवडा भासू लागल्यावर फुले दाम्पत्यांनी ट्रेंड शिक्षिकांसाठी शाळा सुरु केली त्या शालन मधूनप्रशिक्षित पहिली मुस्लिम शिक्षिका म्हणजे फातिमा शेख होत्या.गरिबीमुळे शिक्षणाचे गळते प्रमाण बघून सावित्रीमाईनी काही व्यावहारिक उपौयोज्ना करण्याचे ठरवले.त्या प्रमाणे त्यांनी मुला मुलींच्या आवडीचा अभ्यासक्रम सुरु केला.त्यांना पाटी,दप्तर,पुस्तक इ.साहित्य शाळेतूनच देण्याची व्यवस्था केली.त्याच बरोबर पालकांसाठी साक्षरता अभियान प्रकल्प उभारला.काही कोर्सेस आर्थिक स्वावलंबी बनवतील असे निवडले.विचारांचा विकास व्हावा असे हेतूपूर्वक शिक्षण माईनी दिले.दूरवरच्या मुलांना शिक्षणासाठी येणे शक्य होत नव्हते हि बाबा लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या घरातच वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी सुरु केले.

        सावित्री माईने फक्त शिक्षणा पुरते मर्यादित काम केले नाही ,त्यांनी विधवा पुनर्विवाहास वाव दिला.त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह व बालसंगोपन केंद्र सुरु केले. ब्राम्हण विधवा स्त्रियांच्या केशवपना विरुद्ध नाभिकांना संगठीत करून त्यांचा संप घडून आणला तो दीनबंधू चे संपादक ,कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी मात्र त्या मागची प्रेरणा माई होत्या. आजच्या काळात जसा कोरोन मुळे एका वेगळ्या पद्धतीचा दुष्काळ पडला आहे तसाच एक दुष्काळ १८७७ साली पडला होता त्यावेळी देखील फुले दाम्पत्याने गावोगावी फिरून निधी गोळा केला ,मदत केंद्रे बांधून वेळ प्रसंगी स्वतः हाताने गरिबांचे पोट भरले.वेळ प्रसंगी त्यांनी गरीब स्त्रियांना स्वतःच्या लुगड्यांचे पण दान केले आहे.सत्यशोधक समाजाची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी करण्यात आली.समाजाने पुरोहित नाकारून साध्या पद्धतीने,हुंड्याशिवाय,कमी खर्चातील विवाह लावायचा कार्यक्रम हाती घेतला. पहिला विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी माईंच्या पुढाकाराने व स्वखर्चाने त्यांची मैत्रीण बजूबाई ग्यानोबा निंबाळकर यांची मुलगी राधा हिचा सीताराम बजाजी आल्हाट यांच्याशी झाला.या विवाह मुळे देशभर वादळ उठून ही चळवळ देशव्यापी झाली.हजारो वर्षांची धार्मिक परंपरा नाकारून त्याविरुद्ध विधायक विद्रोह सुरू झाले.आपल्या दत्तक मुलाचा यशवंतचा विवाह देखील याच पद्धतीने ४ फेब्रुवारी १८८९ रोजी केला.इतके योगदान देऊन पण आजही फुले वाड्याकडे कुणाचेही लक्ष नाही ही खंत मनाला खाते.

                  १८९७ साली प्लेगची साथ आली अन सर्वत्र हाहाकार मजला होता.अशा वेळी जोतीरावांच्या पश्च्यात सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व त्या करीत होत्या.त्यापुढे १८९६ चा दुष्काळ व १८९७ ला प्लेग चे थैमान अशा दुहेरी संकटांशी माई खंबीरपणे लढा देत होत्या,त्यांनी त्यांच्या मुलाला यशवंत ला मिलीतरीच्या नोकरीतून रजा काढून बोलावून घेतले आणि स्वतः रोग्यांना दवाखान्यात नेत होत्या अशा व्यक्ती आज कोरोनाच्या काळात किती असा प्रश्न पडतोच. याच धावपळीत माईंना प्लेगची लागण झाली व १० मार्च १८९७ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

 त्याग तुझे भाळी मिरवू तितके कमीच गं,

माह्या कातडीचे वाहू जोडे तितके भाग्य माझे थोडेच गं.

तू जे दिले ते अफाट अफाट अवकाश गं,

प्रयास माझा धूळ पायाची होईल मी तुझ्याच गं ..

  पुनित खांडेकर, ठाणे.

दिगंबर वाघ             

       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


        🙏  एक वचन तीन नियम  🙏

   १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा