जलसंपदा विभागातील लाॅजिंग बोर्डिंगची खोटी बिले सादर केल्यास कारवाई होणार ?

जलसंपदा विभागातील लॉजिंग आणि बोर्डिंगची

खोटी देयके सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 मुंबई प्रतिनिधी : जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील क्षेत्रीय कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांनी लॉजिंग आणि बोर्डिंगची खोटी देयके सादर केली होती त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. ठाणे जिल्ह्यातील घाटघर जलविद्युत प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी लॉजिंग आणि बोर्डिंगची खोटी बिले सादर केल्याबद्दल सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी कनिष्ठ लिपिक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते .यामध्ये 57 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 18 कर्मचाऱ्यांनी अनुज्ञेय पेक्षा जास्त देयकाची प्रतिपूर्ती घेतली. त्यातील एका कर्मचाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला आहे तर एका कर्मचाऱ्याला समज देण्यात आली आहे. पूर्ण रक्कम वसूल करण्याची कार्यवाही आतापर्यंत सुरू आहे. या कर्मचाऱ्यांची अधीक्षक अभियंत्यांकडून चौकशी करण्यात येईल व सर्व नोडल अधिकाऱ्यांशी बोलून दोन महिन्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

         यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, सदाभाऊ खोत, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

दिगंबर वाघ             

    कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


            🙏  एक वचन तीन नियम  🙏

     १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा