शहाड येथिल माॅल कोरोना रुग्णालय आढळून आल्याने सील

शहाड येथिल पटेल आर मार्ट मधील कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने पटेल आर मार्ट सील !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण :  डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी  महापालिका अनेक प्रतिबंधात्मक योजना राबवित आहे. कोरोना रुग्णांचे निदान त्वरित होऊन त्यावर लगेच उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने      ठिक ठिकाणी नागरिकांना अँटीजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली  आहे.

           आज शहाड येथील मोहना नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभा साबळे यांनी ओमकार कॉम्प्लेक्स ,शहाड  येथे लावलेल्या अँटीजेन टेस्ट शिबिरात  पटेल आर मार्ट मधील  25  कर्मचाऱ्यांपैकी  2 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने, अ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी पटेल  आर मार्ट सील केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालणे, वारंवार हात धुणे व  सॅनिटायझर चा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन  महापालिकामार्फत करण्यात येत आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८