कोरोनाचा प्रसार असाच होत राहिला तर रुग्णांना..

रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी  निर्बंध व कठोर उपाययोजनेची गरज -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे


मुंबई प्रतिनिधी : कोरोनाचा प्रसार असाच होत राहिला तर रुग्णांना औषधे, बेड, व्हेंटिलेटर मिळणार नाही. रस्त्यावर मृत्यु होतील, एकूण गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांना एक दोन दिवसांचा वेळ द्यावा व कठोर निर्णय घ्यावा, असे मत नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित केली होती त्यामध्ये शिंदे यांनी आपले विचार मांडले. राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे यांनी व्यक्त केले. रुग्णांचा जीव वाचवायला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठे संकट असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे.  

         अशा गंभीर परिस्थितीत सर्वजण सहकार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माणसाचा जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे सरकारने नागरिकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे असे ते म्हणाले. एमएमआर विभागात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र दिवसेंदिवस रेमडेसिवीरची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा  भासू लागण्याची शक्यता आहे याची दखल घेऊन कार्यवाही करण्याची गरज आहे, असे शिंदे  म्हणाले.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८