या pandemic मध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. - राजेश टोपे,मा. आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य !
मुलांना कोविडच्या संभाव्य लाटेचा सामना करावा लागू नये यासाठी या वेबीनारचे आयोजन केले असल्याची माहिती IMA कल्याण चे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांनी यावेळी दिली. कल्याण-डोंबिवलीतील सर्व वैद्यकीय संघटनांनी कोविड कालावधीत महापालिकेत फार मोलाची मदत केल्याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीतील सर्व वैद्यकीय संघटनांचे आभार मानले. सदर वेबिनार मध्ये देशभरातील सुमारे 700 डॉक्टर्स/ बालरोगतज्ञ सहभागी झाले होते. वेबिनार यशस्वी करण्यासाठी IMA कल्याण चे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांचेसह डॉ इशा पानसरे, डॉ आनंद लीटकर , डॉ गिरीश भिरुड,डॉ सोनाली पाटील, डॉ राजेश राघवराजू डॉ राजेश्वर वानखेडे डॉआशिष पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.