मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाची पाहणी

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट

मुंबई प्रतिनिधी  : तोक्ते या चक्रीवादळामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवान वारे वाहत असून पाऊस देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट दिली.पालकमंत्री ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा व महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आदी उपस्थित होते.
दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८