खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपला - छगन भुजबळ

 

      💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

संपादकीय : काँग्रेसचे युवा नेते राज्यसभा सदस्य खा.राजीव सातव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील एक दुवा हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.

        छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. त्यांच्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काँग्रेस पक्षातील अतिशय निष्ठावान आणि राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेले सातव यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. सातव हे काँग्रेस पक्षातील एक उमदं युवा नेतृत्व होतं. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातील आणि देशातील तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या सातव यांच्या निधनामुळे देशाने एक युवा संसदरत्न व समाजभुषण व्यक्ती गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. सातव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय सातव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती दवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८