जैव विविधता उदयान (Biodivercity Park) च्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी !
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात होणाऱ्या रिंग रोड बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात महापालिकेने MMRDA व वनविभागाच्या सहकार्याने आंबिवली टेकडीवर यापूर्वीच 15 हजार झाडे लावली आहेत, यामुळे टेकडी संवर्धनासह रम्य नैसर्गिक वातावरणाचा आनंद नागरिकांना लुटता येणार आहे.सोलर सिस्टिम आणि ड्रीप इरिगेशन यामुळे 2 वर्षाची झालेली झाडे आता बहरली असून आंबिवली टेकडीवर या झाडांची अधिक गर्द वनराई होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली शहर अभियंता सपना कोळी आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी CSR फंडासाठी केलेल्या आवाहनाला आता प्रतिसाद मिळाला आहे.आय नेचर फाऊंडेशन यांनी 3 वर्षासाठी या परिसरात उद्याने विकसित करण्यासाठी महापालिकेबरोबर करार केला असून त्यासाठी DCB बँककडून सीएसआर फंडातून सुमारे 3.5 कोटींचे अर्थसहाय याकामी मिळणार आहे. 40 एकराच्या या जागेत बर्ड गार्डन, बॅट गार्डन, बटरफ्लाय गार्डन, बी गार्डन, मेडिसिन गार्डन, राशी वन व छोटा जलाशय अशा प्रकारची 7 उद्याने विकसित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे 10 हजार वृक्षांची लागवडही केली जाणार आहे. आंबिवली टेकडीवर नेचर ट्रेलची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक लोकांना प्रशिक्षण दिले जाणार असून या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल.
कल्याणच्या आसपास अशाप्रकारे कुठलेही पार्क व वाईल्ड लाईफ सॅक्च्युरी नसल्यामुळे कल्याणमध्ये विकसित होत असलेल्या या Biodivercity Park ला विशेष महत्त्व आहे. या समयी घकव्य विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, अ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व अनेक वृक्ष प्रेमी उपस्थित होते.