द व्हायरल फिवर कंपनीकडून पाच लाख रुपयांचा धनादेश जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयासाठी महापौरांकडे सुपूर्द
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “द व्हायरल फिवर” कंपनीचे संस्थापक अर्णबकुमार यांनी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॅामा केअर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने, रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद नगरकर यांच्याकडे पाच लाखाचा धनादेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते भायखळा येथील महापौर निवासस्थानी आज दिनांक १४ जून २०२१ रोजी सुपुर्द केला.“द व्हायरल फिवर” कंपनीचे संस्थापक अर्णबकुमार यांनी गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य कल्याणासाठी आर्थिक मदतीचे उचललेले पाऊल हे सर्वांना प्रेरणादायी असल्याचे महापौरांनी यावेळी प्रतिपादन केले.
याप्रसंगी व्हायरल फिवरच्या मानव संसाधन अधिकारी भुवनेश्वरी, जोगेश्वरीतील सामाजिक कार्यकर्ते विशाल येरागी व बुद्धेश्वर हे उपस्थित होते.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८