महापालिकेच्या 6/ फ प्रभागात अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण  :  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांचे मार्गदर्शनाखाली फ प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व डॅडी चौक, भोईरवाडी, खंबाळपाडा येथील आशिष सिंग यांचे G+2 चालू असलेले अनधिकृत बांधकाम ‍ निष्कासनाची कारवाई  केली. सदर कारवाई महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी/कामगार, ठेकदाराचे 10 कर्मचारी, टिळकनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व 1पोकलेन आणि 2 जेसीबी यांच्या मदतीने 2 दिवसात पूर्ण  करण्यात आली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८