फ प्रभागक्षेत्रात वाळकु जोशी बिल्डींग ही अतिधोकादायक इमारत निष्कासनाची धडक कारवाई !
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आणि अति. आयुक्त सुनिल पवार व विभागीय उप आयुक्त पल्लवी भागवत यांचे मार्गदर्शनाखाली 6/फ प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी डोंबिवली (पुर्व) येथील ठाकुर्ली पोलिस चौकी समोरील ‘वाळकु जोशी बिल्डींग’ (तळ+4) या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाचे काम दि. 22/07/2021 रोजी पासून सुरू केले होते. गेल्या 7 दिवसात सदर इमारत निष्कासनाचे काम मनुष्यबळाने करण्यात येऊन दि.28/07/2021 व दि.29/07/2021 रोजी 1 पोकलेन मशीनच्या सहाय्याने सदर इमारतीच्या निष्कासनाचे काम पूर्णतः करण्यात येवून ते काल सायंकाळ पर्यंत पूर्ण झाले. सदर इमारत 1980 साली बांधण्यात आली होती व ती इमारत 41 वर्ष जुनी होती. ‘वाळकु जोशी बिल्डींगला’ मागील 7 वर्षापासून अतिधोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावण्यात येत होती, या इमारतीमध्ये एकुण 38 सदनिका व 5 गाळे होते.
सदर इमारतीस मा.उच्च न्यालयालयाने 2016 पासून मनाई हुकुम दिलेला होता, मा.उच्च न्यायालयाने दि.08/07/2021 रोजी सदर इमारत 7 दिवसात रिकामी करून पुढील 15 दिवसात निष्कासनाची कारवाई करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सदर इमारत रिकामी करून इमारतीमध्ये राहणा-या भाडेकरुचे सर्व्हेक्षण करुन इमारतीमधील सर्व भाडेकरू/मालक यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. या इमारतीच्या निष्कासनाची कारवाई, महापालिका फ प्रभाग अतिक्रमण निर्मुलन विभागाचे 10 कर्मचारी/कामगार, उप अभियंता शैलेश मळेकर, अनिल इंगळे, अधिक्षक (अ.बां.नि.), रामनगर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे पोलिस कर्मचारी, वाहतुक शाखा पोलिस कर्मचारी व 4 ब्रेकर, 1 पोकलन, 1 जेसीबी यांच्या सहाय्याने संयुक्तपणे करण्यात आली.