५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची
ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
महाराष्ट्र गेल्या दीड वर्षापासून कोविड परिस्थितीशी समर्थपणे मुकाबला करीत आहे. या काळात कोविडच्या चाचण्या करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळा उभारणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णालय तयार करणे, आवश्यक ती साधनसामुग्री निर्माण करणे, ऑक्सिजनची उपलब्धता निर्माण करणे यासारख्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या. महाराष्ट्रावरील संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नसून अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यात आवश्यक त्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्यात येत आहे. आपले दैनंदिन जीवन पूर्ववत होण्यासाठी राज्य शासनाच्या या सर्व प्रयत्नात सर्वसामान्यांची साथ असणे तितकेच आवश्यक आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरु करण्यात आल्याची माहितीही यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी दिली.
शाळा- महाविद्यालय सुरु करण्यात महाराष्ट्र आघाडी घेईल
राज्यात कोविडचा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून गेल्या वर्षी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आल्या. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदाला आणण्याचा प्रयत्न होत असताना शाळा- महाविद्यालये सुरु करण्यात महाराष्ट्र आघाडी घेईल, असा विश्वासही देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. या सेमिनारमध्ये अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी गेल्या दीड वर्षात बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत कोविडचा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.