कन्नड येथे डॉ.सिताराम जाधव यांच्याहस्ते मच्छीबीज वाटप

पावसाळा उशिरा सुरू झाल्याने मत्स्य उत्पादक अडचणीत.

औरंगाबाद प्रतिनिधी : माशाची आणलेली जात कोबडा, कटला, मिरगल, राहू,गरसकारप, बिरगेट, इत्यादी जातीचे माशाची बिजवाई देण्यात आली. यंदाचा पावसाळा उशिराने सूरु झाल्याने,मत्स्य बीजे धरणात टाकण्यास उशीर होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने कन्नड तालुक्यातील मत्स्य उत्पादक अडचणीत सापडले असून अजूनही तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात व तळ्यात पुरेसे पाणी आले नाही,यामुळे मत्स्य उत्पादकांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान जुलै महिन्याच्या 10 तारखे नंतर तालुक्यात तुरळक व मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाल्याने विविध धरणात टाकण्यासाठी मत्स्य बीजाचे वाटप आता सुरू झाले आहे. 

       कन्नड तालुका धरणांचा व तलावांचा तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यात शिवना टाकळी, अंजना पळशी,अंबाडी,गडदगड सह छोट्या मोठ्या धरणे व तळ्यांची संख्या मोठी आहे.या मुळे तालुक्यात मत्स्य व्यवसाय चांगलाच स्थिरावला आहे.या धरणात व तळ्यात विविध मच्छीमार संस्थेने शासनाकडून मासे पाळण्याचे व पकडून विक्री करण्याचे अधिकार खरेदी केलेले आहेत.त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात या धरणात व तळ्यात मत्स्य बीजे टाकली जातात.मात्र या वर्षी पावसाळा लांबल्याने आता म्हणजे तब्बल एक महिना उशिरा मत्स्य बीजे टाकली जात आहे.वेळेवर पाऊस सुरू झाला असता तर आतापर्यंत सदरील मासे 100 ते 150 ग्राम वजनाचे झाले असते.मात्र आता टाकलेल्या बिजा पासून परिपूर्ण मासे मिळण्यास दरवर्षी पेक्षा एक ते दीड महिना उशीर लागणार आहे यावेळी यांची उपस्थिती होती भोईसमाज मराठवाडा अध्यक्ष, चंद्रकांत लाडे चिवळी मा.सरपंच पांडूरंग किसन कडाळे सुरेश ठाकर रावसाहेब मधे भरत मोरे वालमिक ठाकर शिवनात ठाकर लालचंद चव्हाण संतोष लाडे कैलास लाडे दादाराव वायडे संतोष सोनवणे आदींना मंच्छी बिजं देण्यात आले.

कोंबडा व कटला मासा प्रसिद्ध

     कन्नड तालुक्यात प्रामुख्याने कोंबडा व कटला मासा उत्पादित केला जातो.याशिवाय राहू,मिरगल, ब्रिगेड,गरसकार्प हे मासे उत्पादित केले जातात.सध्या या माशाचा भाव 160 रुपये ते 250 रुपये प्रति डबा असा आहे.एका डब्यात मत्स्य बीजच्या वया नुसार 300 ते 1000 बीजे असतात. कन्नडला आग्रा,सुरत,कलकत्ता येथून मत्स्य बीज मागवले जातात.

 पीक विम्या सारखे मत्स्य विमा मिळावा  -चंद्रकांत लाडे मत्स्य उत्पादक कन्नड.

   मत्स्य उत्पादन हे शेती उत्पादनासारखेच आहे.हे उत्पादनही पावसावर व हवामानावर अवलंबून आहे.शेती मध्ये जसा पीकविमा मिळतो तसा पीकविमा मत्स्य उत्पादकांना शासनाकडून काढून मिळावा.कारण कधी पाऊस न पडल्याने उत्पादन कमी होते तर जास्त पावसाने कधी मासे वाहून जातात.तसेच मत्स्य उत्पादकांना अनुदानातून मत्स्य बीज मिळावे अशी आमची मागणी आहे.

⚫ मासे पकडण्याची मजुरी वाढवून मिळावी.  - राजेंद्र ढोले मजूर कन्नड

      धरणातून मासे पकडण्याची मजुरी सध्या 15 रुपये किलो आहे.रात्रभर पाण्यात थांबून आम्ही मासे पकडतो व व्यापारी तेच मासे 200 रुपये किलोने विकतात. सदर मजुरी किमान 30 रुपये किलो प्रमाणे असणे आवश्यक आहे.अनेक वेळी मासे हाती लागत नाही,तेव्हा उपासमार होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८