फोन टॅपिंग संदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली जाईल - गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

मुंबई प्रतिनिधी : विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत 2016-17 मध्ये ते खासदार असताना त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले. वळसे-पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग हे प्रकरण गंभीर असून याबाबत सविस्तर उच्च स्तरीय चौकशी करुन याबाबतचा अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करण्यात येईल असे नमूद केले.

विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार

      विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल असे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. वळसे-पाटील म्हणाले की, विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८