रिलायन्स जीओ कडून मालमत्ता करापोटी रू.11 कोटी जमा !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महानगरपालिकेने या आर्थिक वर्षात माहे एप्रिल 2021 ते माहे ऑगस्ट 2021 या कालावधीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरणा-या करदात्यास मालमत्ता करात 5 टक्के सवलत देण्यात आली होती. या मोहिमेस करदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून या कालावधीत नागरीकांनी रू.160.64 कोटी रूपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत केली आहे. गतवर्षी याच कालावधीत रू.110.22 कोटी रक्कम मालमत्ता करापोटी महापालिकेकडे जमा झाली होती.

         महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर वसूलीचा धडाका पूढेही सूरू ठेवला असून रिलायन्स जिओच्या नव्याने कर निर्धारण केलेल्या मोबाईल टॉवर्सचे मालमत्ता करापोटी रक्कम रू.11 कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा करणेकामी धनाकर्ष रिलायन्स जिओचे मॅनेजर यांनी आज महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचेकडे सूपूर्द केले. सदर वसूली आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (कर) विनय कुळकर्णी यांनी केली असून यापुढील मालमत्ता कर वसूलीकामी कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त महोदय यांनी दिलेले आहेत. तसेच मोबाईल टॉवरचे परवानगी व इतर समस्या निराकरणाकरीता पुढील आठवडयात सर्व संबधितांची बैठक घेवून समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त महोदय यांनी दिले. सर्व सन्माननीय करदात्यांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मिळकतीचा मालमत्ता कर विहित वेळेत महापालिकेत जमा करून महापालिकेस सहकार्य करावे व कटू कारवाई टाळावी. 

ॲड.दिगंबर वाघ.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८