बी.एम.सी.आयुक्तच्या विरोधात १ ऑक्टोंबर २०२१ ला उपोषण

लोकशाहीचा चौथा स्तंभ करणार उपोषण

⬛ सहा.सुरक्षा अधिकारी कैलास सुपे आणि प्रमुख सुरक्षा अधिकारी रवींद्र पाटील यांना तात्काळ निलंबित करा होणाऱ्यारे उपोषण टाळा - संजय हंडोरे संस्थापक अध्यक्ष

मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिकेच्या राजावाडी रूग्णालयातील सहा.सुरक्षा अधिकारी कैलास सुपे  यांनी कोकण विभाग पत्रकार संघ पत्रकार संघ मुंबई तथा सप्तरंगचे कार्यकारी संपादक दिगंबर वाघ यांना डिसेंबर २०२० मध्ये जिवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत वारंवार यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केला असून आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह आयुक्त इक्बाल सिंह चहल मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून देखील कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट सुपे यांना पदोन्नती देण्याचे काम चालू आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी दिगंबर वाघ यांनी सुरक्षा विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात दंड थोपटले आहेत त्यामध्ये प्रमुख सुरक्षा अधिकारी हे या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करतात या कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना आरामात काम दिले जाते तर इतर कर्मचाऱ्यांना मात्र शिक्षा म्हणून तीन सिपमध्ये ड्युटी कामावर बोलवले जाते. या विरोधात कोणी तक्रार दिली की त्यां कर्मचाऱ्यावर कारवाई करायची आणि कारवाई मागे घेण्यासाठी पैशाची मागणी करून त्याला त्रास द्यायचा अशाप्रकारे व्यवहार होतात राजावाडी येथे सहाय्यक सुरक्षा अधिकारी हे १५ ऑगस्ट २०२१ रोजी झेंडावंदनला सुद्धा उपस्थित नव्हते यापुर्वीही यांची तक्रार स्वराज्य बहूद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आली होती.येथील झेंडावंदन सुरक्षा कर्मचारी करतात मग अधिकारी कशासाठी असतो फक्त आणि फक्त पैसे खाण्यासाठी ? याबाबत तक्रार करून म्हणजेच आज या प्रकरणाला १० महिने होऊन गेले तरी कारवाई होत नाही सुपे हे कुणाला पोहसता ? याचीही चौकशी होणे गरजेचे होते. ज्या अधिकाऱ्याकडे या विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी आहेत. त्यामध्ये प्रमुख सुरक्षा अधिकारी रविंद्र पाटील अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी कारवाई केली नाही यांचा अतिरेक म्हणजे यांनी सरचिटणीस यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहेत ?  एकाही पत्राचे आज पर्यंत उत्तर दिलेले नाहीत.

      म.न.पातील अधिकारी हे जर पत्रकारांना अशी वागणूक देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याची विचार न केलेला बरा यांनी कोरोना (कोविड-१९) चा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केलेले असावेत म्हणून हे नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणणाऱ्या घटकांस उपोषण करण्याची वेळ येत असेल तर यांचेही दुर्भाग्य समजावे ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. आयुक्तांच्या बाजूने यावर बोलण्यासाठी कुणालाही वेळ नाही निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर इक्बाल सिंग चहल यांना त्यांचे पी.ए यांनी भेटू दिले नाहीत. त्यामुळे हे निवेदन पदाधिकाऱ्यांनी आवक-जावक आणि ई-मेल द्वारे पाठवले आहेत.

       यामध्ये अधिकारी आणि पी.ए हे अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्यामुळे यांची दादागिरी वाढली आहे नियमानुसार यांच्या बदल्या ? होत नाहीत हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागे मोठे आर्थिक रेकेट असल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते जो बोलतो त्यावरच कारवाई होते त्यामुळे नियमानुसार काम कधी होतील असा प्रश्न अनेक नागरिक सामाजिक संस्था विचारत आहेत.

▶️ उपोषण जर करू नये असा विचार आयुक्त यांचा असेल तर तात्काळ सहा.सुरक्षा अधिकारी कैलास सुपे व प्रमुख सुरक्षा अधिकारी रवींद्र पाटील यांचे निलंबन करावे. अन्यथा उपोषण होणारच मग ते जेलमध्ये की आयुक्ताच्या समोर निर्णय हा आयुक्तांनी घ्यावा - अण्णासाहेब कुलये मुंबई अध्यक्ष

▶️ हे पोषण करण्यासाठी आयुक्त यांचे संबंधित अधिकारी यांनी आम्हाला प्रवृत्त केले आहेत आम्ही १०  महिन्यांपासून वारंवार पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली होती.परंतू आजपर्यंत असे काही झाले नाही म्हणून ही वेळ आली.यामध्ये अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, दक्ष नागरिक यांनी पाठिंबा देऊन उपोषण मध्ये सहभागी होणार असल्याचे कळविले आहेत.माझी म.न.पासेवेतील तमाम कर्मचारी अधिकारी यांना विनंती आहे की ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांनीही पाठिंबा नोंदवावा. दिगंबर वाघ सरचिटणीस तथा कार्यकारी संपादक 

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८