दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) आढावा बैठक - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. आज मनोरंजन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारले असून फिल्मसिटीमध्ये दरदिवशी वेगवेगळ्या माध्यमांसाठी चित्रीकरण होत असते. या माध्यमांची आवश्यकता लक्षात घेऊन पुनर्विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सध्या आपण सर्वच कोविडशी मुकाबला करीत आहोत. येणाऱ्या काळात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना प्राधान्याने फिल्मसिटीचा पुनर्विकास करणे गरजेचे आहे. नव्याने करण्यात येणारा पुनर्विकास कसा असेल, त्याचे टप्पे कसे असतील, पुर्नविकास करीत असताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत, पुनर्विकासाचा टप्पा किती वर्षांचा असेल अशा सर्व बाबींवर चर्चा यावेळी करण्यात आली.