अखिल भारतीय समता परिषद सिल्लोड तालुक्याच्या वतीने आनंदोत्सव साजरा -संतोष धाडगे समता परिषद

सत्य परेशान हो सकता है,लेकीन पराजित नही 

सिल्लोड प्रतिनिधी  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर दिल्लीतील महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी अनेक आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी भुजबळ यांची नाहक बदनामी देखील करण्यात आली. मात्र आज मुंबई सत्र न्यायालयाने भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. यावर "सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही," अशी प्रतिक्रिया व्यक्त करत छगन भुजबळ यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या प्रकरणात जवळपास सव्वा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. अनेक खोटेनाटे आरोप आमच्यावर झाले तसेच मीडीया ट्रायलदेखील झाली. हा संपूर्ण संघर्षमय प्रवास भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना उलगडून सांगितला. या कठीण काळात ज्या मंडळींनी सहकार्य केले त्या सर्वांचे भुजबळ यांनी आभार व्यक्त केले. समीर भुजबळ निर्दोष होतो, एका पैशाचाही घोटाळा झालेला नाही याची खात्री पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही आरोपांची राळ उठवण्यात आली. हे सर्व द्वेषबुद्धीने करण्यात आले ?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

      छगन भुजबळ साहेब व भुजबळ कुटुंबीयांची निर्दोष मुक्तता झाल्या बद्धल सिल्लोड तालुक्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव व मिठाई वाटप केली. यामध्ये जिल्हा प्रमुख नारायण फाळके तालुका प्रमुख सचिन गोरे शहर प्रमुख राजु बनसोड माहिला शहर प्रमुख शकुंतला बनसोड.संतोष धाडगे अमोल कुदळ योगेश कुदळ ज्ञानेश्वर कुदळ दादाराव काळे मंजितराव भागयवंत संतोष भागयवंत मारुती पाडंव राजु जाधव राहूल प्रशाद चेतन जाधव कल्याणकर लखन बनसोड.  यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८