आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी एक कोटींची वाढ

मुंबई प्रतिनिधी : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची वाढ करण्यात आली असून त्यामुळे आता प्रत्येक आमदारांना त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. नियोजन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.राज्यातल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची वाढ करुन तो तीन कोटी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली होती, तसेच भविष्यात या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी वाढ करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आमदारांचा विकास निधी चार कोटी रुपये करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

    त्याचबरोबर आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून, प्रत्येकी एक कोटीचा निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास आमदारांना परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८