पाटील म्हणाले, अंबरनाथ शहरामध्ये ज्या ठिकाणी पाण्याच्या अनधिकृत जोडण्या असतील त्या तातडीने काढण्यात याव्यात. सन 2048 च्या संभाव्य लोकसंख्येनुसार अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी 228.68 द.ल.लीटर पाण्याची आवश्यकता असून सध्या 168 द.ल.लीटर पाण्याचे आरक्षण उपलब्ध आहे. अतिरिक्त 60 द.ल.लीटर पाण्याच्या आरक्षणाबाबत जलसंपदा विभागाकडे मागणी करण्यात यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंबरनाथ शहराकरीता आवश्यक अतिरिक्त पाण्याची साठवण क्षमता तयार करावी. त्याचबरोबर एमआयडीसीने तातडीची उपाययोजना म्हणून शहरास अतिरिक्त 10 द.ल.लीटर पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८