शहराची प्रतिमा शहराच्या स्वच्छतेवर प्रथमत: अवलंबुन आहे ?

स्वच्छतेच्या कामाबाबत कुचराई केल्यास खपवून घेतले जाणार नाही !   डॉ. विजय सूर्यवंशी आयुक्त 

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण शहराची प्रतिमा शहराच्या स्वच्छतेवर प्रथमत: अवलंबुन असते त्यामुळे स्वच्छतेच्या कामाबाबत कुचराई केल्यास खपवून घेतले जाणार नाही , असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज उप आयुक्त ,घनकचरा व्यवस्थापन, उप अभियंता, घकव्य, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी व स्वच्छतेसाठी महापालिकेस मदत करणारा शिक्षक वर्ग यांचे समवेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.कोविडच्या तीव्र लाटेत स्वच्छतेबाबत चांगले काम झाले, ते आताही व्हायला हवे, कचरा शहरात दिसता कामा नये, कारण शहर स्वच्छ असावे ही नागरिकांची माफक अपेक्षा आहे.त्यामुळे कचरा करणा-या फेरीवाले, दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असेही निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.

    25 मे, 2020 पासून " शुन्य कचरा मोहिम" महापालिकेने सुरु केली, परंतू Garbage Vulnerlable Points (GVP- वारंवार कचरा पडणारी ठिकाणे) अदयाप काही ठिकाणी आहे. त्यामुळे प्रत्येक मुख्य आरोग्य निरिक्षक/ आरोग्य निरिक्षक यांनी 2 GVP आणि शिक्षकांनी 1 GVP ची नियमित पाहणी करुन ते बंद होतील अशा उपाययोजना कराव्यात, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. घकव्य चे उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून काही शिक्षक कचरा पडताळणी कामी पुढे सरसावले. शिक्षकांकडे समाजाचे मत परिवर्तनाची, लोकांना पटवून देण्याची चांगली क्षमता असते त्यामुळे शिक्षकवर्गाची याकामी खुप मदत झाली, या शब्दात त्यांचे आयुक्तांनी विशेष कौतुक केले.सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेकडेही लक्ष दयावे, अशा सुचना आयुक्तांनी बैठकीत उपस्थित असलेल्या मुख्य आरोग्य निरिक्षक/आरोग्य निरिक्षक यांना दिल्या.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार दि. 25 ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबविल्या जाणा-या विशेष स्वच्छता सप्ताहात  घकव्य विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी काटेकोरपणे पूर्ण नियोजन करावे , असे निर्देश महापालिका आयुक्तांनी यावेळी दिले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८