१० जणांचा मृत्यू १ जण अत्यवस्थ आगीच्या चौकशीसाठी समिती स्थापन

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी

मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश दुर्घटनेसंदर्भात व्यक्त केला शोक

मुंबई प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटने संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

अहमदनगर जिल्हा रुग्णालय जीवितहानीबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील अग्निकांडात झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयु विभागात झालेल्या दुर्दैवी अग्निकांडात काही निरपराध रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना सद्गती लाभो,  यासाठी प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो. दुर्घटनेतील जखमींना त्वरित बरे वाटावे ही प्रार्थना करतो, असे उत्तराखंड दौऱ्यावर असलेल्या राज्यपालांनी आपल्या  संदेशामध्ये म्हटले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड विभागाला आग 10 जणांचा मृत्यू, 1 जण अत्यवस्थ आगीच्या चौकशीसाठी समिती स्थाप

    अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉर्टसक्रीटमुळे आग लागली. या विभागात 17 कोवीड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर 1 रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे‌. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली.जिल्हाधिकारी भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली आहे. 

    भोसले म्हणाले, नाशिक येथे झालेल्या गॅस गळती घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८