रस्त्यावरील अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई !

हापालिकेच्या 10/ई प्रभागात रस्त्यावरील अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवा !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण महापालिका  क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या  निर्देशानुसार 10/ई प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार आणि त्यांच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी यांनी महापालिका पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांच्या मदतीने 10/ई प्रभागक्षेत्रांतर्गत कल्याण शिळ रोड ते अनंतम रिजन्सी या रस्त्यालगत असलेल्या गॅरेजवाल्यांवर कारवाई करत 12 गाळयांचे पक्के जोते, 67 मंडप शेड  तसेच रस्त्यावरील  08 टप-यांवर निष्कासनाची  धडक कारवाई केली. त्याचप्रमाणे रस्त्यावर उभ्या असलेल्या  05 चार चाकी गाडया, 02 टेम्पो व 05 मोटार सायकल अशी एकुण 12 बेवारस वाहने उचलून खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८