जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी डॉ. महाशब्दे यांना शपथ

मुंबई प्रतिनिधी  : डॉ. साधना सुनील महाशब्दे यांना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदाची शपथ देण्यात आली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला.यावेळी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य संजय कुलकर्णी श्वेताली ठाकरे जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम सचिव बसवंत स्वामी मुख्य अभियंता अतुल कपोले प्राधिकरणाचे सचिव रामनाथ सोनवणे उपसचिव जया पोतदार आदी उपस्थित होते.

    डॉ. साधना महाशब्दे यांची विधी क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. महाशब्दे यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्यातील मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्या मागील वीस वर्षे मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. त्यांचा पर्यावरण विषयक कायदा क्षेत्रात विशेष अभ्यास आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८