क.डों.म.न.पा.च्या पाच आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल !

ल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ अधिकाऱ्यांवर कल्याण न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल.

    पोलिसांनी फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (420, 418, 415, 467, 448, 120 बी, 34, 9, 13 कलमांतर्गत) गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली आहे. या प्रकरणी गोविंद राठोड रामनाथ सोनवणे एसएस भिसे, ई रवींद्रन, गोविंद बोडके या पाच तत्कालीन केडीएमसी आयुक्तांसह, केडीएमसी अधिकारी संबंधित विकासक, आर्किटेक्ट अशा 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनी इमारत पुनर्वसन प्रकरणी केडीएमसी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. निर्धारित नियमांचे उल्लंघन करत मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली असल्याचा आरोप तत्कालीन नगरसेवक अरुण गिध यांनी केला आहे. याबाबत गिध यांनी केडीएमसीसह पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र काहीच कारवाई न झाल्याने अखेर गिध यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८