खाकी वर्दीतील राहूल मांडगे यांनी जोपासली गायनाची कला..

डोंबिवलीतल्या पोलिस राहूल मांडगे यांचे गाणे पसंतीला उतरले.... "देशसेवेबरोबर जोपासली कलाही"

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : डोंबिवली येथे काम करताना अंगातील कलागुण जोपासण्याचा प्रयत्न तसे फारसे नसतात. त्यात ड्युटीचा ताण कामाची न ठरलेली वेळ यामुळे व्यस्त जीवनात पोलीस पार थकून जातात. पण ड्युटी करताना असेही पोलीस आहेत की जे आपले आपली कला जोपासतात. डोंबिवलीत एक पोलीसाचे 'क्या हुआ तेरा वादा' हे गीत प्रचंड व्हायरल होते आहे. फक्त एक संधी आणि हा पोलीस फिल्मी दुनियेत आपल्या गाण्याने रसिकांना वेड लावेल.

    डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील 47 वर्षीय राहुल मांडगे हे गेल्या 27 वर्षांपासून पोलीस खात्यात काम करतायत. लहानपनापासून गायनाची आवड आल्याने मांडगे आपल्या कलेला वाव मिळवा खूप प्रयत्न करत आहेत. 'क्या हुआ तेरा वादा' हे मांडगे यांचे हिंदीतील आवडते गीत सध्या सोशल मोडियावर खुप गाजत आहे. तर स्व. रमेश देव यांच्या चित्रपटातील 'सूर तेच छेडीता' हे मांडगे यांचे आवडते गीत.

    मांडगे हे  पदवीधर झाल्यावर पोलीस खात्यात भरती झाले. त्यांनतर मांडगे यांनी आपली कला नुसती जोपासलीच नाही तर कला सदरची केली.मांडगे यांनी पोलिसांच्या गेट टू टूरगेदर मध्ये गीत गाऊन मने जिंकली. राजेश कुलकर्णी आणि अभिषेक नलावडे यांनी मांडगे यांना गायनांचे धडे शिकले. डोंबिवलीतील पोलीस गायनात प्रसिद्ध झाले असून पोलीस खात्यात मांडगे यांचे कौतुक होत आहे.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८