राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्याचा सश्रम कारावास

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा फ्लॅट बद्दलची माहिती लपवणे आले अंगलट.

मुंबई प्रतिनिधी  : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारेंनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

    बच्चू कडू यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणे त्यांच्या अंगलट आले आहे.बच्चू कडू यांनी मुंबईत ४२ लाख ४६ हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असुन देखील २०१४ ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नसल्याचा आरोप बच्चू कडूंवर होता. याच आरोपांवरुन २०१७ मध्ये कडू विरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता.

    बच्चू कडू यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी ते फेटाळून लावले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे ४० लाख रुपये कर्ज देखील उपलब्ध करुन दिले होते. मात्र कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांपूर्वीच ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडू यांनी त्यावेळी केलेला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे २०१७ मध्ये बच्चू कडूंनी म्हटले होते.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८