जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन महापालिकेतर्फे रॅलीचे आयोजन !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : 24 मार्च 2022 रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी  जनजागृती करणेकामी  कल्याण मधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयापासून   महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी /कर्मचारी तसेच बिर्ला महाविदयालय, प्रगती महाविदयालय, मॉडेल महाविदयालयाचे विदयार्थी/ विदयार्थिनी तसेच जन स्वराज्य सेवा फाऊंडेशन , अपलिफ्ट इंडीया असोसिएशन या एनजीओजचे कर्मचारी यांची रॅली काढण्यात आली. “Invest to End TB, Save Lives” (क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी गुंतवणूक करा, जीवन वाचवा) ही सन 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेची Theme  असून   या Theme चे फलक हाती प्रदर्शित करीत सदर रॅली काढण्यात आली.

    महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके,शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. समीर सरवणकर, टि.बी. कंट्रोल सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.  सदर रॅली  बाई रुक्मिणीबाई रुग्णालयापासून आग्रा रोड मार्गे  सहजानंद चौकातून सुभाष मैदान येथे येवून रॅलीची सांगता झाली. यासमयी डॉ. समीर सरवणकर व टि.बी. कंट्रोल सोसायटीचे जितेंद्र चौधरी यांनी  टि.बी.ची लक्षणे, त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत उपस्थित विदयार्थ्यांना माहिती दिली.या व्यतिरिक्त 24 मार्च 2022 ते 13 एप्रिल 2022 या कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८