कोविडचे संकट आले तेव्हा महापालिकेकडे अत्यंत अपुरे इंफ्रास्ट्रक्चर होते -डॉ. विजय सूर्यवंशी

आपल्यावर उद्भवलेल्या  संकटांचे एका संधीमध्ये कसे रूपांतर करावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस राष्ट्रीय पातळीवरील मिळालेला कोविड इनोव्हेशन पुरस्कार! -महापालिका आयुक्त 

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : आपल्यावर उद्भवलेल्या  संकटांचे एका संधीमध्ये कसे रूपांतर करावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस राष्ट्रीय पातळीवरील मिळालेला कोविड इनोव्हेशन पुरस्कार असे उदगार महापालिका आयुक्त डॉ.  विजय सूर्यवंशी यांनी आज काढले भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड स्पर्धा 2020 मध्ये (ISAC) कोविड इनोव्हेशन -19 या कॅटेगरी मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेस जाहीर झालेला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे हरदीप पुरी यांचे हस्ते स्विकारताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे उद्गार काढले. यावेळी हरदीप पुरी यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व इतर विजेत्यांची प्रशंसा केली 

    प्रथमतः जेव्हा कोविडचे संकट आले तेव्हा महापालिकेकडे अत्यंत अपुरे इंफ्रास्ट्रक्चर होते. महापालिकेची दोन रुग्णालये आणि केवळ 40 टक्के मनुष्यबळाची उपलब्धता यावर  या संकटाचा सामना करणे सर्वथा अशक्य होते, त्यामुळे आम्ही कल्याण व डोंबिवली मधील इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, कॅम्पा व इतर डॉक्टर संघटनांशी संपर्क साधून डॉक्टर आर्मी तयार केली. यामध्ये सुमारे तीनशे डॉक्टरांचा सहभाग होता महापालिकेच्या हॉस्पिटलमधील तुटपुंजी व्यवस्था पाहता महापालिकेने तीन खाजगी रुग्णालयांशी सामंजस्य करार करून त्यांच्यामार्फत शेकडो कोविड रुग्णांना मोफत उपचार दिला. डॉक्टर्स आर्मी मधील डॉक्टरांनी  या बिकट काळात महापालिकेचे तापाचे दवाखाने/ नागरी आरोग्य केंद्र, महापालिकेचे रुग्णालये चालविण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले, याच काळात आम्ही फॅमिली डॉक्टर कोविड फायटर ही अभिनव संकल्पना कल्याण-डोंबिवलीत राबविली. त्यामध्ये डॉक्टरांचे क्लस्टर तयार करून रुग्णांना उपचार देण्यात आले, म्हणूनच कोरोना रूग्णांना उपचार मिळणे सहज सुलभ झाले आणि कोविडच्या प्रारंभापासूनच महापालिकेचा मृत्युदर दोन टक्केपेक्षा कमी राहण्यास मदत झाली, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्या समयी दिली.महानगरपालिकेने पहिला covid-19 डॅशबोर्ड तयार केला. कोविडमधिल संचार बंदीच्या काळात आपले मंडी हे ॲप तयार करून नागरिकांना फळ, अन्नधान्याचा  पुरवठा केला. वृद्ध, अपंग नागरिकांना घरपोच अन्नधान्य व इतर सहाय्याची व्यवस्था महापालिकेमार्फत स्वयंसेवकामार्फत उपलब्ध करून दिली. त्यामुळे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात असूनही covid-19 वर नियंत्रण राखण्यास महापालिकेस यश प्राप्त झाले अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

    महापालिकेस प्राप्त झालेला covid-19 इनोव्हेशन अवॉर्ड हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार इनोवेशन इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट साठी प्रामुख्याने महापालिकेस प्राप्त झाला असून आज हा पुरस्कार महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि एसकेडीसीएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांनी स्वीकारला. या सोहळ्यामध्ये फ्रीडम टू वॉक या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यास प्राप्त झालेला प्रथम पुरस्कार त्याच्या वतीने महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांनी स्वीकारला.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८