के.डी.एम.सी.च्या घनकचरा विभागातील स्वच्छता अधिकारी यांना चुकीचे काम...

ल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता अघिकारांना कनिष्ठ पदावरील काम.

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील स्वच्छता निरिक्षकांना नुकतेच रखडलेल्या पदोन्नती देण्यात आली. त्यांना स्वच्छता अघिकारी या पदावर नेमणूक करुन त्यांना जतुंनाशक फवारणी आणि बाजार व परवाना विभागातील बाजार फी वसुलीचे कामासह दैनंदिन साफसफाई/ स्वच्छता निरीक्षक/बाजार व परवाना निरीक्षक/ जतुंनाशक फवारणी निरीक्षक अशी कनिष्ठ 

    पदावरील कामाची अतिरिक्त काम देण्यात आलेले आहेत. यात बऱ्याच स्वच्छता निरिक्षक हे शारीरिक दृष्ट्या  कमकुवत आहेत. आणि कनिष्ठ पदावरील कर्मचारी या बाबत नाराज असल्यामुळे या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी महानगर सफाई कर्मचारी महासंघ या संघटनेकडे मागणी केली आहेत. 

    यावर संघटने लगेच आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांच्याकडे विभागीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे या संघटनेच्या वतीने अध्यक्ष भरत लक्ष्मण गायकवाड सुनील जाधव कार्याध्यक्ष यांनी सप्तरंग वृत्तपत्राशी बोलतानी सांगितले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८