नामदेव शिरगावकरची इंडिया तायक्वांदो बोगस संघटना:उच्च न्यायालय

वी दिल्ली प्रतिनिधी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया हीच खरी अधिकृत संघटना असून नामदेव शिरगावकर अध्यक्ष असलेली  इंडिया तायक्वांदो  ही संघटना बोगस आहे असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

    शिरगावकर यांची संघटना बोगस असल्याने तिची मान्यता रद्द करण्यात यावी असा युक्तिवाद केल्यावर न्यायमूर्ती यांनी शिरगावकर अध्यक्ष असलेल्या संघटनेस निवडणूका घेणयाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.इंडियन तायक्वांदो  ही बेकायदेशीर संघटना आहे, या संघटनेस मुळातच आंतरराष्ट्रीय तायक्वांदो संघटनेकडून मान्यता मिळालेली नाही परिणामी नामदेव शिरगावकर यांची अध्यक्षपदी झालेली निवडच अनधिकृत आहे.जागतिक तायक्वांदो आणि भारतीय औलिंपिक संघटनेची फसवणूक व खोटा दावा करत फेडरेशनची नोंदणी झाल्याचा केलेला दावाही साफ खोटा आहे, यावर सदरील माननीय न्यायालयाचया निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे.

    माहितीच्या अधिकार अर्जावर सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मुंबई यांनी दिलेल्या उत्तरात हे सिद्ध झाले आहे, याचीही नोंद दिल्ली उच्च न्यायालयाने घेऊन हा निकाल दिला आहे.तसेच इंडिया तायक्वांदो संघटना नोंदणीकृत असल्याचा शिरगावकर यांचा दावा साफ खोटा आहे, ही जागतिक तायक्वांदो आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची फसवणूकच आहे. नामदेव शिरगावकर सदस्य एम.एस.बाली, दिग्विजय सिंग यांना नवीन कार्यकारिणीनी बनविण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही दरम्यान तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव प्रभात शर्मा यांनी इंडिया तायक्वांदो ही नोंदणीकृत फेडरेशन नसून शिरगावकर यांनी जागतिक तायक्वांदो संघटना आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची फसवणूकच केली आहे,असे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

सेवानिवृत्त न्यायाधीश आर.ए.सोधी यांनी सखोल परिक्षणाअंती हा निकाल दिला आहे.

माजी न्यायमूर्ती सिसतानी यांनी सोधी यांच्या घटनापीठाकडे हा विषय सोप्विला होता.

    नामदेव शिरगावकर याने खेळाचे बाजारीकरण केले आहे. त्याने तायक्वांदो बरोबर असे अनेक खेळांमध्ये या प्रकारे खेळ संपवण्याचे काम करत आहे  त्यामुळे त्याला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कोणत्याही पदावर न ठेवता त्याची लवकरात लवकर हकालपट्टी करावी असे तायक्वांदो फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव मिलिंद पठारे सप्तरंग वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८