आज स्व. वसंतराव नाईक यांची जयंती

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवाद

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    याप्रसंगी विधानसभेचे सदस्य तथा विधानसभा माजी अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सदस्य डॉ. रणजित पाटील, राजेश राठोड, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव राजेश तारवी विधानपरिषदेचे सभापती यांचे सचिव महेंद्र काज, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांचेसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.तसेच मंत्रालय येथे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

नवी दिल्ली  : हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का) डॉ. निरुपमा डांगे  यांनी  वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्‍यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

हाराष्ट्र परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांना अभिवाद

    महाराष्ट्र परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक(अ.का) अमरज्योतकौर अरोरा यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  कार्यालयात  उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली  वाहिली.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८

 निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा,मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या..