जेनरिक औषधाद्वारे रुग्णांना औषधी उपलब्ध करुन देणे,आशियाई विकास बँकेद्वारे अर्थसहाय्यित प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.जळगाव येथील प्रस्तावित शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि प्रस्तावित मेडिकल हब बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे. केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत मंजुरी प्राप्त असलेले बायो मेडिसिनल प्लांट इन्स्टिट्यूट जामनेर तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत इंटिग्रेटेड रेसिडेन्शिअल बिल्डिंग बांधकामासाठी प्राधान्याने प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. हाफकीन संस्थेच्या बळकटीकरणासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल,या करीता पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने सुचवलेल्या शिफारशी अमलात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी तसेच बांधकामाधीन वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरणावर रुग्णालयाचे परिचलन व्यवस्थापन करण्यावर प्राधान्य द्यावे असेही महाजन म्हणाले.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८