कारवाई करताना खाजगी मोबाईल'चा वापर करणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई पोलीस महासंचालकांनी जारी केले आदेश !
भिवंडी प्रतिनिधी अरुण पाटील : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी ई-चलानच्या माध्यमातून दंड (चालान) वसुल करत असतात. काही वेळा स्थानिक पोलिसही नियम मोडणाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई करताना दिसतात. यावेळी पोलीस कर्मचारी त्यांना दिलेल्या डिव्हाईस मधून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करतात. या डिव्हाईसमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचा फोटो काढला जातो.
मात्र काही वेळा वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी वाहतूक पोलीस स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करून वाहन चालकांना कायद्याची भीती दाखवून त्यांच्या कडुन बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्यासाठी दंड वसुल करून आपल्या खिशात टाकतानाच्या घटना सर्वत्र पाहायला मिळतात. त्यामुळे आता अशा पोलिसांवर कारवाई होणार आहे.
परंतु हे तर काहीच नाही भिवंडीतील उप वाहतूक शाखा-कोनगाव (भिवंडी) उप वाहतूक शाखा-शहर (भिवंडी) व उप वाहतूक शाखा-नारपोली (भिवंडी) या पैकी काही ठिकाणी नेमलेले वार्डन (खाजगी वाहतूक मदतनीस) हे देखील पर जिल्ह्यातील व पर राज्यातील वाहन चालकांना आडवून आपल्या खाजगी मोबाईल वरुुन फोटो काढून त्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्या कडुन चिरी मिरी घेताना खुलेआम दिसत आहेत. मात्र त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्थानिक नागरिकांकडुन बोलले जात आहे. तर काही ठिकाणी वार्डन सरकारी ई -चलान मशीनचा व वॉकी टॉकीचा वापर करत असल्याचे नागरिकांन कडुन बोलले आहे.
त्यामुळे आता जर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे फोटो काढताना पोलीस,वाहतूक कर्मचारी अथवा अधिकाऱ्याने खाजगी मोबाईलचा वापर करून स्वतःच्या फायद्यासाठी दंड वसुल केला तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार असून त्या बाबत वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी या संदर्भात पत्रक काढलं आहे.
त्यामुळे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांनीं ई-चलान मशिनचाच वापर करावा लागणार आहे. जर जे वाहतूक पोलीस कारवाई वेळी खासगी मोबाईलचा वापर करतील व तसे आढळून आल्यास त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याच येईल तसे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काढले आहेत.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८