भिवंडीतील गुजरात मार्गावर दरोडा टाकणाऱ्या ११ जणांच्या टोळीला तालुका पोलिसांकडून अटक ! "पिस्तूल, काडतूसासह वाहन जप्त"

भिवंडी अरुण पाटील : भिवंडी तालुक्यातील गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर पिस्तूलातून गोळीबार करून दरोडा टाकून मालासह ट्रक पळविण्याऱ्या ११ जणांच्या टोळीला भिवंडी तालूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या अनुशंगाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी गंभीर दखल घेत अंजूर फाटा-वसई मार्गावर शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लाऊन ११ जणांना विविध राज्यातून ताब्यात घेत अटक केली आहे.त्यांच्या कडुन पिस्तूल काडतूसासह लाखो रुपये किंमतीच्या वाहनासह मुद्देमाल जप्त केला आहे.

    सविस्तर वृत्त असेकी भिवंडी येथून गुजरातकडे आठ टन तांबे घेऊन निघालेल्या ट्रक चालकावर गोळीबार करीत मालवाहू ट्रक पळवून नेला या प्रकरणी 6 ऑगष्ट रोजी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक जितेंद्र आगरकर व वरिष्ठ पो निरी दत्तात्रय बोराटे यांनी सहाय्यक पोलीस निरी सचिन कुलकर्णी व पोलिस पथकातील सहाय्यक पो उपनिरी तोडासे, पो हवा. काळढोक भालेराव भामरे केदार मुकादम विशे पवार बेलदार यांचे विशेष पोलीस पथक निर्माण करून तपास सुरु केला होता .

   या पथकाने मुंबई मानखुर्द येथे कारवाई करीत इम्रान बन्ने खान ( रा.गोवंडी मुंबई ) व मो. एजाज मोह. शमीम अन्सारी व धीरजकुमार उमेश चौधरी ( दोघे रा.मुज्जफरपूर बिहार ) यांना ताब्यात घेत एक चोरीचा ट्रक त्यांच्या ताब्यातून जप्त केला. त्यानंतर या तिघा आरोपींंची कसून चौकशी केली असता या टोळीतील नवीनकुमार झा (रा.नालासोपारा), नीरज बजरंग सिंग (रा.सुरत गुजरात), शाहिद उर्फ वसीम रमजानी मंसुरी (रा.शिवडी मुंबई,) जॉन उर्फ जॉन मो. कलीम खान (रा.नवी मुंबई) जीवन रमेश जाधव, यश महेंद्र भारती (दोघे रा.सुकाळी जि.यवतमाळ) टोळीचा प्रमुख राजसिंह धनसुख गुजर (रा.बिकानेर राजस्थान ) यास तेलंगणा येथून ताब्यात घेतले तर विनोद सहानी उर्फ बिहारी यास बोचहॅं बिहार येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली.या टोळीच्या ताब्यातून एक ट्रक, तीन दुचाकी, एक रिक्षा अशा पाच वाहनांसह एक पिस्टल १० जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे.तर नवी मुंबई, रबाळे, एम आय डी सी महाड येथील प्रत्येकी एक तर तालुका पोलीस ठाण्यातील दोन अशा एकूण पाच गुन्ह्यांचा उलगडा केला असून इम्रान बन्ने खान, मोहम्मद एजाज मोह. शमीम अन्सारी, धीरज कुमार उमेश चौधरी यांना पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात वण्यात आली आहे,

   नवीनकुमार झा नीरज बजरंग सिंग शाहिद उर्फ वसीम रमजानी जॉन उर्फ जॉन मोहम्मद कलीम खान जीवन रमेश जाधव, यश महेंद्र भारती, राजसिंह धनसुख गुजर यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर सुत्रधार विनोद सहानी उर्फ बिहारी यास बिहार येथून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.भिवंडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना एका आंतरराज्य टोळीचा सुगावा पोलिसांना लागल्याने अजून काही गुन्ह्याचा उलगडा त्यांच्या कडून होणार आहे. या गुन्ह्यांचा अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे व. पो.निरी दत्तात्रय बोराटे स.पो. निरी सचिन कुलकर्णी करीत आहेत.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८