परिवहन विभागाचे कामचोर उप-आयुक्त तात्काळ निलंबन करा.

अभय देशपांडे श्याम लोही व श्रीकांत महाजन हे सेवेतून तात्काळ निलंबित होणार ?

मुंबई प्रतिनिधी : परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयामधील अनेक अधिकारी यांना स्वतः साठी किंवा वरिष्ठांसाठी वसूली टार्गेट दिले आहेत ? पोलिस दलातील वाझेप्रमाणे याची ही चौकशी होणे गरजेचे आहे  कोकण विभाग पत्रकार संघ यांनी ११ फेब्रुवारी २०२२ पासुन आजपर्यंत अनेक तक्रारी दिल्या त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही माहिती अधिकार अधिनियम-२००५ नुसार यांनी माहितीची मागणी केल्यानंतर यांनी जळगाव परिवहन कार्यालयाकडे विचारणा केली असे कळवले या कार्यालयाचे जन माहिती अधिकारी भोसले यांनी या कार्यालयामध्ये पत्र उपलब्ध नाही असे बालीशपणा सारखे उत्तर दिले.

    आपल्या कार्यालयामध्ये आलेल्या तक्रारीवर कोणती ही कारवाई होत नाही. जेव्हा तक्रारदार यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती विचारली तेव्हा आपले अधिकारी थातूरमातूर पत्र काढून संबंधित कार्यालयाकडे खुलासा मागविण्यात येत आहेत.अभय देशपांडे उप-आयुक्त (अंमल-२) यांना लिहिता व वाचता येत नसून यांना मराठीतील बाराखडीची कोणतीही माहिती नाही. कारण म्हणजे यांनी तक्रारदार यांना कसले कार्यकारी संचालक बनवले त्याचा आदेश यांनी स्वतः च्या स्वाक्षरीने द्यावा.हे या पदावर आर्थिक देवाण-घेवाण करून बसले आहेत का ? याचीही चौकशी होणे गरजेचे आहेत. मा.उच्च न्यायालयाचा निकाल (याचिका क्र.६७३१/२०१२) यामध्ये नागरिकांच्या निवेदनावर /तक्रारीवर १२ आठवड्यामध्ये कार्यवाही करून तक्रारदारास कळवावे असा आदेश असून सुद्धा आपल्या कार्यालयातील अधिकारी हे कर्मचाऱ्यांसोबत असलेले लागेबांधे दलालाप्रमाणे असल्यासारखे कामे करतात. यांचे उदाहरण म्हणजे देशपांडे हे स्वतः होय देशपांडे यांना कायद्याचे किंवा कायदेशीर ज्ञान नाहीत का? तर एवढ्या मोठ्या पदावर कुणाच्या आशीर्वादाने आले किंवा बसवले याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहेत.

   महाराष्ट्रातील परिवहन कार्यालय कोणतीही सेवा ही वेळेत देत नाही तसेच वाहनचालक /मालक व नागरिकांची लूट करीत आहेत. नागरिक स्वतः कोणत्या ही कामासाठी आले तर त्यांचे काम होत नाही याउलट एजंट मार्फत गेले की कोणतेही पेपर लागत नाही आणि त्याबाबत कुणी तक्रार आयुक्त कार्यालयात केली तर त्यावर वर्षानुवर्ष कारवाई होत नाही मग नागरिकांनी काय करावे. आपल्या कार्यालयासमोर आत्महत्या करावी की काय? याबाबत आपण स्वतः खुलासा करावा. आपण अभय देशपांडे उप-आयुक्त (अंमल-२) श्याम लोही आणि श्रीकांत महाजन यांचे तात्काळ निलंबन करावे. अन्यथा हिवाळी अधिवेशन काळात कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई. हे आपल्या कार्यालयासह महाराष्ट्रातील संपूर्ण प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आंदोलन उपोषण करणार आणि त्या दरम्यान घडणाऱ्या होणाऱ्या घटनांना आपण स्वतः आणि आपले कार्यालय जबाबदार असेल. कारण आपण कोणती ही सेवा विहित मुदतीत देत नसल्यामुळे आपणच आम्हाला आंदोलन उपोषण करण्यासाठी भाग पाडीत आहेत. याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी.

* आयुक्त यांची यावर आम्ही प्रतिक्रिया घेण्यासाठी दुरध्वनी क्रमांक फोन केला परंतु त्यांच्या महिला पीए या त्यांच्यापर्यंत फोन देत नाही त्यांना कळले असेल फोन देऊ नका किंवा या यांच्या मनाप्रमाणे काम करित आहेत ?

आमची आयुक्त यांना परत एकदा  नम्र विनंती आहे की या तीनही अधिकारी यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे. जेणेकरून आम्हाला आंदोलन उपोषण करण्याची वेळ येणार नाही. हे तीन अधिकारी म्हणजे हा एक टिझर आहेत. महाराष्ट्रात असे आपले अनेक अधिकारी आहेत बाकी आहेत.-दिगंबर वाघ सरचिटणीस

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८