कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : आधीच वाहतूक कोंडी आणि बजबजपुरीने गजबजलेल्या कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे लोकांना अक्षरशः नकोसे झाले आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुल कामांचे काही टप्पे पूर्ण होईपर्यंत कल्याण स्टेशन परिसरातील बाहेरगावच्या एसटी, एनएनएमटी, केडीएमटी बसेस दुर्गाडी चौकातून सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे.
येत्या सोमवारपासून म्हणजेच ५ डिसेंबरपासून बाहेरगावच्या बसेस सुटण्याचे हे बदल लागू होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.दरम्यान केडीएमसी मुख्यालयात झालेल्या या बैठकीला केडीएमसी अधिकारी, वाहतूक पोलीस,एसटी अधिकारी, परिवहन अधिकारी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८