१४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप, संप १००℅ यशस्वी करण्याचा निर्धार

शिक्षक भारती जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होणार

नाशिक प्रतिनिधी  : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाने  १२ फेब्रुवारी २०२३ ला नागरी सेवा प्रबोधिनी नाशिक येथील सभेत सर्वांना जुनी पेन्शन लागु करावी या मुख्य मागणी साठी १४ मार्च २०२३पासुन बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. संपाची नोटीस २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासनास देण्यात येईल. बेमुदत संप १००℅यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकारिणी मंडळाचे राज्यातील सर्व जिल्हाचे पदाधिकार्यांनी व्यक्त केला. शिक्षक भारतीने ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्नेहसंमेलनात बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.शिक्षक भारती संघटना समन्वय समीतीचा घटक असून जुन्या पेन्शनसाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी संमेलनात केले आहे.
    राज्याध्यक्ष अशोक दगडे प्रदेश सरचिटणीस विश्वास काटकर मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी  सर्व जिल्हाचे अध्यक्ष सरचिटणीस आणि सदस्य यांसोबत राज्यभर समन्वय समीतीबरोबर शिक्षक भारतीचे पदाधिकारी बैठका घेऊन संप १००% यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सुभाष मोरे म्हणाले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८