जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी पुणे येथे राज्यस्तरीय कार्यशाळा



मुंबई प्रतिनिधी : ग्रामविकास विभागाच्या योजना गतिमान करून तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्यावतीने पुणे येथील आर्किड हॉटेल मध्ये दि. 4 ते 5 फेब्रुवारी, 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.ही कार्यशाळा ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे. या कार्यशाळेला जिल्हा परिषदांचे  सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (विकास), उपायुक्त (आस्थापना), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), राज्यस्तरावरील सर्व अधिकारी व कार्पोरेट कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.

    या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना गतिमान करण्याचे नियोजन व अंमलबजावणी करणे, तसेच जिल्ह्यांनी सुरू केलेल्या नाविण्यपूर्ण योजना व यशोगाथांचे सादरीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावतीने करण्यात येणार आहे.या कार्यशाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अमृत महाआवास अभियान अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे 2024’ कार्यक्रमाचे सादरीकरण, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सुधारित ग्राम स्वराज अभियानाची (RGSA) अंमलबजावणी, बचत गटांच्या उत्पादनांना बाजार जोडणी इ. विषयावर चर्चा करण्यात येणार असून यावेळी व्हिएसटीएफ अंतर्गत कार्पोरेट कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज विभागाने केले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८